Kashmir Connection – काश्मीर कनेक्शन

Price: Either no price found or multiple price is found. Features: Publisher ‏ : ‎ Publisher: J K Media (5 November 2022) Language ‏ : ‎ Marathi Paperback ‏ : ‎ 199 pages ISBN-10 ‏ : ‎ 8195464017 ISBN-13 ‏ : ‎ 978-8195464012 Reading age ‏ : ‎ 10 years and up Item Weight ‏…

Where to buy

Kashmir Connection – काश्मीर कनेक्शन

Price: Either no price found or multiple price is found.

Features:

  • Publisher ‏ : ‎ Publisher: J K Media (5 November 2022)
  • Language ‏ : ‎ Marathi
  • Paperback ‏ : ‎ 199 pages
  • ISBN-10 ‏ : ‎ 8195464017
  • ISBN-13 ‏ : ‎ 978-8195464012
  • Reading age ‏ : ‎ 10 years and up
  • Item Weight ‏ : ‎ 260 g
  • Country of Origin ‏ : ‎ India

काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरचे सुष्टीसौंदर्य, तपशीलवार भौगोलिक वर्णने ही या कादंबरीची खास वैशिष्ट्ये आहेत. इतिहासापासून वर्तमानापर्यंतचे संदर्भ देत भारत-पाकिस्तान संघर्ष आणि दोन्हीकडील राजकीय वास्तव यावर प्रकाश टाकणारी ही कादंबरी आहे. काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नेहमी ऐकलेल्या, वाचलेल्या ठिकाणांहून भिन्न भिन्न ठिकाणे, त्यांचे भौगोलिक वर्णन, निसर्ग वर्णन वाचून त्या भागात प्रत्यक्ष पोहोचल्याचा आभास हे पुस्तक वाचताना निर्माण होतो. भारतीय गुप्तहेर यंत्रणेचे प्रमुख, आय.एस.आय.चे डायरेक्टर जनरल, भारताचे पंतप्रधान, पाकिस्तानचे पंतप्रधान, अतिरेकी कादिर सईद, अतिरेकी उस्मानभाई, भारताचा गुप्तहेर मोहित कौल, मुस्कान, डायना अशा अनेक व्यक्तिरेखा डोळ्यांसमोर हुबेहूब उभ्या राहतात. कादंबरी वाचताना ही पात्रे आपल्या मनाचा ताबा घेतात आणि आपल्याला कथानकात शेवटपर्यंत गुंतवून ठेवतात, हे या कादंबरीचे बलस्थान आहे. भारत आणि पाकिस्तानातील राजकीय घडामोडी, राजकीय संघर्ष यांचे मनोरंजक चित्रण करताना प्रत्येक प्रसंगात लेखकाची अफाट कल्पनाशक्ती दिसून येते, असे इथे खास नमूद करावेसे वाटते. प्रत्येक प्रकरणामधील प्रसंग वाचकाची उत्कंठा वाढवत परमोच्च बिंदू गाठत जातो, त्यामुळे ही कादंबरी वाचकाला खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरली आहे. एकंदरीत, राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरच्या मनमोहक निसर्गात बहरत जाणाऱ्या एका हळुवार प्रेमाच्या सुगंधाची अनुभूती देणारी, वळणावळणावर धक्के देत अतिशय वेगात पुढे सरकणारी एक चित्तथरारक आणि तितकीच उत्कंठावर्धक अशी ही कादंबरी आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Kashmir Connection – काश्मीर कनेक्शन”
Scroll to Top